Threads app information in marathi – थ्रेड्स ॲप बद्दल माहिती! ॲप कसे वापरायचे?

Meta कंपनीच्या नवीन आणि लोकप्रिय Threads App बद्दल माहिती (Threads app information in marathi) आज जाणून घेणार आहोत. Twitter सारखेच फिचर्स असणारे Threads App अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाले आहे. ह्याच ॲप बद्दल Threads app information in marathi आज सविस्तर माहिती ह्या लेखा मध्ये जाणून घेऊया.

थ्रेड्स ॲपबद्दल सविस्तर माहिती – Threads app information in marathi

Meta या अमेरिकन सोशल मीडिया कंपनीने 5 जुलै 2023 मध्ये Threads नावाचे नवीन सोशल मीडिया अॅप लाँच केले. हे प्लॅटफॉर्म Twitter सारखेच Micro-blogging Platform आहे. थ्रेड्स हे सार्वजनिक संभाषण आणि रिअल-टाइम अपडेटसाठी एक अनोखे व्यासपीठ आहे. जिथे वापरकर्ते मजकूर पोस्ट लिहू शकतात किंवा फोटो, व्हिडिओ शेअर करू शकतात. अॅपमध्ये लाईक, कमेंट, रिट्विट आणि शेअर सारखे पर्याय देखील दिले आहेत.

या पोस्टमध्ये, आम्ही मेटाच्या नवीन प्लॅटफॉर्म थ्रेड्स अॅपबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तसेच वाचकांना विनंती आहे की, संपूर्ण पोस्ट वाचावी आणि शक्य तितक्या लोकांना शेअर करावी. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करूया. तसेच डिजिटल खजिना Facebook पेज ला नक्की फॉलो करा.

मेटा कंपनीचे थ्रेड्स अॅप डाउनलोड करण्यासाठी www.threads.net ह्या वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच, iOS वापरणारे App Store वरून डाउनलोड करू शकतात. आणि Android वापरकर्ते Google Play Store वरून डाउनलोड करू शकतात. भारतासह 100 हून अधिक देशांमध्ये हे Threads App उपलब्ध आहे. परंतु सुरुवातीच्या काळात Threads App युरोपमध्ये उपलब्ध होणार नाही, असे Meta कंपनीने सांगितले आहे. Threads app information in marathi

हे नक्की वाचा : UPI Payment Tips Marathi

Threads App in marathi
Threads App in marathi

थ्रेड्स ॲप कसे वापरायचे? संपूर्ण मार्गदर्शन – Threads app in marathi

मेटा थ्रेड्ससाठी साइन अप करणे खूप सोपे आहे. फक्त तुमच्याकडे Instagram Account असणे गरजेचे आहे. Threads App वापरण्यासाठी अगोदर डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर ओपन करा.

आता तुमच्या Instagram हँडलच्या साहाय्याने threads app वर लॉग इन करा. (जर तुम्ही आधीच फोनवर Instagram मध्ये लॉग इन केले असेल, तर तुम्हाला Instagram पासवर्डची आवश्यकता नाही.)

Threads वर लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या सर्व लोकांची संपूर्ण यादी पाहायला मिळेल.

थ्रेड अॅप मध्ये वापरकर्त्यांना 500 शब्दांपर्यंत मर्यादित मजकूर पोस्ट करता येऊ शकतो. तसेच, पोस्ट आणि टिप्पण्यांमध्ये फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतात. इन्स्टाग्राम प्रमाणेच मुख्य फीडमध्ये वापरकर्त्यांना कंटेंट आणि पोस्ट्स पाहायला मिळतात. ज्यांना तुम्ही Threads वर फॉलो केले आहे.

हे नक्की वाचा : Top freelancing Websites in Marathi

सध्या, मेटा थ्रेड्स अॅपमध्ये कोणत्याही जाहिराती दर्शवत नाही आहे. तथापि, App वर जास्त युजर्स वाढल्यावर जाहिराती दाखवू शकतात. पण तोपर्यंत, मेटा थ्रेड्स वापरताना कोणत्याही जाहिराती दिसणार नाही.

इंस्टाग्राम वर जर तुमच्या अकाउंट वर ब्लू टिक असेल तर, मेटा थ्रेड्स ॲप वर सुद्धा तुम्हाला ब्ल्यू टिक दिसेल. (मेटा व्हेरिफाईडचे सदस्यत्व घेतलेल्या वापरकर्त्यांना मेटा थ्रेड्सवर निळा टिक असेल.) Threads app information in marathi

थ्रेड्स ॲप मध्ये असलेले बेस्ट फिचर्स – Threads App Features information in marathi

 • 500 शब्दांपर्यंत पोस्ट करू शकतो.
 • पाच मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकतो, तसेच लिंक्स आणि फोटो सुद्धा.
 • नवीन वैशिष्ट्ये, जसे की स्क्रीन-रीडर आणि AI ऑल्ट मजकूर उपलब्ध आहे.
 • Instagram च्या सुरक्षा नियमासारखे Threads मध्ये सुद्धा, सारखेच नियम आहे. जसे की अनफॉलो करणे, ब्लॉक करणे, restrict करणे आणि प्रोफाइलची तक्रार करणे, इत्यादी.
 • फॉलो केलेल्या खात्यांवरील पोस्ट आणि नवीन शिफारस केलेल्या सामग्री सह फीड तुम्हाला threads app वर दिसेल.

FAQ

 1. Threads चे एकूण किती वापरकर्ते आहेत?

  लॉन्च झाल्यानंतर काही तासांतच, थ्रेड्सने 30 दशलक्ष साइनअप मिळवले, आणि केवळ पाच दिवसांत 100 दशलक्ष वापरकर्ते गाठले. हा एक रेकॉर्ड सेट केला आहे.

 2. थ्रेड्स Twitter पेक्षा वेगळे कसे आहे?

  थ्रेड्समध्ये Twitter सारखी वैशिष्ट्ये नाही. जसे की, लांब व्हिडिओ, थेट संदेश किंवा थेट ऑडिओ रूम, इत्यादी. थ्रेड्स हे फोटो आणि व्हिडिओ जोडण्याच्या क्षमतेसह शॉर्ट-फॉर्म मजकूर पोस्ट (500 शब्दांपर्यंत मर्यादित) वर लक्ष केंद्रित करते.

Threads app information in marathi – इंटरनेटवरील अश्याच विविध विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या Digital Khajina ह्या मराठी ब्लॉग ला भेट द्या. तसेच ह्या ब्लॉग बद्दल तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा नक्की सांगा.

Paytm App information in Marathi

Google Pay information in Marathi

7 thoughts on “Threads app information in marathi – थ्रेड्स ॲप बद्दल माहिती! ॲप कसे वापरायचे?”

Leave a Comment